top of page
Search

Gender Identity Disorder

लिंगभाव ओळख विकृती


लिंगभाव ओळख (Gender Identity) म्हणजे आपण पुरुष आहोत किंवा स्त्री आहोत असा संभ्रम वाटणे. ही संकल्पना लिंगभूमिका या संकल्पनेपेक्षा वेगळी आहे. लिंगभूमिका (Gender Role)म्हणजे एखाद्याच्या बाह्य वर्तनावरील स्त्रीत्व (Femininity) किंवा पुरुषत्व (Masculinity) होय.


व्यक्तिच्या विविध वर्तन वैशिष्ट्याप्रमाणे लिंगभाव ओळखीचा तिच्या जैविक लिंगाशी निश्चितपणे संबंध असतो. तथापि,अशा काही दुर्मिळ व्यक्ती असतात की, ते त्यांच्या निसर्गदत्त जैविक लिंगातबद्दल अतिशय बैचेन असतात आणि त्यांना आपल्या विरुद्ध लिंगी असावे अशी प्रबळ इच्छा असते. एकंदरीत त्यांना त्यांचे जन्मदत्त देहरूप अस्वस्थ करणारे वाटते आणि त्यांच्या ठिकाणी लिंगांतरत्वाची इच्छा तीव्रच होत जाते. अशा प्रकारची विकृती असणाऱ्या प्रौढ व्यक्तींना लिंगातरभावी व्यक्ती (Trans Sexual Individual) असे म्हटले आहे. वर वर्णन केलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी अशा व्यक्ती खर्चिक अशा शस्त्रक्रियेद्वारे लिंगाततर करून घेतात.डीएसएम-चार आय लिंगभाव ओळख विकृतीचे दोन घटक स्पष्ट केले आहेत.


1. विरुद्ध लिंगभाव ओळख (Cross Gender Identification)

यामध्ये विरुद्ध लिंगी असण्याबाबतची व्यक्तीची प्रबळ आणि टिकाऊ स्वरूपाची इच्छा यांचा समावेश होतो. म्हणजेच आपण विरुद्ध लिंगी असावे अशी व्यक्तीची तीव्र इच्छा असते. किंवा आपण विरुद्ध लिंगी आहोत असा व्यक्तीचा आग्रह असतो.


2. लिंगभाव चिंतावसाद (Gender Dysphoria)

यामध्ये स्वतःच्या जैविक लिंगांबद्दल व्यक्तीला सातत्याने अस्वस्थ वाटते. तसेच करावे लागणारी लिंग भूमिका ही चुकीची आहे अशी तिची भावना असते.



For More Information, Please Call on – 9082897659.





57 views0 comments

Comments


bottom of page