
Substance Dependence
मादक द्रव्यावलंबन मादक पदार्थ अवलंबन हा मादक पदार्थांच्या वापराशी संबंधित असमायोजक प्रकार स्पष्ट केला आहे. या विकृतीच्या व्यक्तीला ज्याचे व्यसन आहे त्या विशिष्ट औषधांसाठी शारीरिक श्रुधा (Craving) निर्माण होते. मादक द्रव्यावलंबन प्रकाराचे निकष (खालील पैकी तीन किंवा जास्त निकष जर बारा महिन्यांच्या कालावधीत दिसून आले तर मादक द्रव्य अवलंबन विकृती आहे असे मानले जाते ) 1. सहिष्णुता (Tolerance) अपेक्षित परिणाम साधण्यासाठी विशिष्ट पदार्थ जास्त प्रमाणात सातत्याने घेण्याची गरज वाढणे.