top of page
Search

Brain Impairment and Adult Disorder

मेंदूचा ऱ्हास व प्रौढावस्थेतील विकृती (Brain Impairment and Adult Disorder)


1994 मध्ये डीएसएम चे चौथे वर्गीकरण येण्यापूर्वी येथे चर्चेलेल्या बहुसंख्य विकृती ऐद्रीय मेंदू विकृती (Organic Mental Disorder) या नावाने परिचित होत्या; परंतु हे नाव वापरल्यामुळे मेंदूच्या दुखापतीमुळे निर्माण होणारे चेतासंस्थिय परिणाम मनोविकृतीजन्य समस्या यात भेद करणे कठीण जात असते. मेंदूमध्ये कोणताही दोष नसताना सुद्धा संवेदनभ्रम, विभ्रम व अवसादअवस्था इत्यादी प्रकारची लक्षणे मेंदू विकारांमध्ये निर्माण होतात व मेंदू दोष निर्माण झाल्यावरही अशी लक्षणे दिसतात.


त्यामुळे मेंदूच्या ऱ्हासामुळे उत्पन्न होणारे परिणाम व ऱ्हास रहित अशा मनोविकारामुळे होणारे परिणाम यात फरक करता येत नसे.आता ऐद्रिक मेंदूविकृतीना मेंदूंच्या ऱ्हासामुळे निर्माण होणाऱ्या प्रौढ वयातील विकृती असे संबोधले जाते.


मेंदूंच्या पेशींचा नाश झाल्यामुळे होणारे नुकसान कधी मर्यादित असते, तर कधी फार ते व्यापक असते.


हे नुकसान पुढील घटकांवर अवलंबून असते.

1. चेतासंस्थिय हानीचे स्वरूप, ठिकाण व व्यापकता

2. रुग्णांचे विकृतीपूर्वक व्यक्तिमत्व

3. रुग्णाचे एकंदरीत जीवन

4. विकृतीच्या प्रथम उद्भवानंतर व्यक्तीच झालेला कालावधी सर्वसाधारणपणे मेंदूची हानी जितक जास्त तितके त्याचे नुकसान जास्त असते परंतु काही रुग्णांच्या बाबतीत किंचित हानीमुळे मोठे नुकसान व काहींच्या बाबतीत मोठ्या हानीनंतरही नगण्य नुकसान अशी स्थिती असू शकते.



For More Information, Please Call on – 9082897659.





87 views0 comments

Comments


bottom of page