top of page
Search

Treatment Of Alcohol-Related Disorders

मद्याधीनतेवरील उपचारांची पहिली पायरी म्हणजे निर्विषीकरण Detoxification करणे. याचा उद्देश विषारी पदार्थांचे शरीरावर झालेले परिणाम दूर करणे हा असतो. साधारणपणे भरपूर मध्य घेणे थांबवल्यावर 6 ते 24 तासात अपवेशन लक्षणे सुरू होतात, किंवा ती लगेचही सुरू होतात. त्यात झटके, Delirium, घाम गोंधळ, रक्तदाब वाढणे, खळबळ इत्यादींचा समावेश होतो.


अनेक मद्यासक्त माणसे स्वतःहून मद्य सोडतात; पण काही मद्याच्या अति आहारी गेलेली असतात त्यांना हळूहळू त्यातून बाहेर काढावे लागते. निर्वीषीकरण पूर्ण झाल्यावर झोपेचा त्रास, विषाद, चिंता ही लक्षणे काही आठवडे, काही महिनेही टिकतात. ज्यांची नोकरी कायमस्वरूपी असते, त्यांना कुटुंबाचा आधार असतो ते लवकर सुधारतात. उपचारामधला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मद्यासक्ताने त्याचा आजार मान्य करणे.


साधारणपणे अशा व्यक्तींना लाज वाटत असते. अपराधी वाटत असते त्यांची समस्या ते अमान्य करतात. त्यांच्या कुटुंबापासून मित्रापासून ती लपवतात. परंतु मद्यासक्ताने त्यांच्या मद्यपान समस्येचा गांभीर्य ओळखणे आवश्यक असते. मद्यासक्तीवरील उपचारांचे अनेक दृष्टीकोन आहेत ते पुढील प्रमाणे


• जैविक दृष्टीकोन (Biological Approch)

• मनसोपचार दृष्टीकोन (Psychological Treatment Approch )

• समूह उपचार (Group Therapy )

• कुटुंबोपचार (Family Therapy )

• परिस्थितीजन्य मध्यस्थ उपचार (Environmental Intervation)

• वर्तनोपचार पद्धत (Behaviour Therapy)

• बोधात्मक दृष्टिकोन (Cognitive Approach)For More Information, Please Call on – 9082897659.

141 views0 comments

Recent Posts

See All

Comentários


bottom of page