top of page
Search

How to check your negative thoughts

Updated: Nov 21, 2022

स्वतःचे नकारात्मक विचार कसे पडताळावेत? अथवा विचार अद्यावत करणे म्हणजे काय?

✓ मनात येणाऱ्या वाईट , नकारात्मक विचारांना लगेचच खरे न समजता , त्या विचारांना प्रश्न विचारून सगळ्या बाजूंनी उलघडा करून मगच ते कितपत खरे किंवा खोटे आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे.

✓. जर स्वतःच्या नकारात्मक विचारांचा अतिरेक होत आहे असे आपल्याला जाणवत असेल तर आणि आपल्या मानसिक स्वस्थ्य ढासळत असेल रोजच्या कामांमध्ये त्या विचारांचा अडथळा होत असेल तर आपले विचार पडताळून घेणे आवश्यक आहे.

✓ एखादा विचार आपल्या मनात सतत येत असेल व त्याचा आपल्याला त्रास होतो आहे हे समजल्यावर कागद पेन घेऊन एखाद्या शांत ठिकाणी बसावे.


∆ पुढील प्रश्न स्वतः ला विचारून जी उत्तरे मनात येतील तशी ती कागदावर लिहावी.


१.स्वतः चे विचार कसे पडताळावेत ?

२. मला जे काही विचार येतायत त्या विचारांचा ठोस पुरावा माझ्याजवळ आहे का ?

३. हा विचार माझ्या मनात कसा आला आहे ?

४. ह्या विचारांचा मी मनात सातत्य करून दिलं आहे का?

५. ह्या विचारांचा अजून वेगळ्या पद्धतीने कसा विचार करता येईल ?

६. असे विचार करून मला काय फायदा होतोय ?

७. हे असे विचार करून माझ काय नुकसान होतंय ?


विचार पडताळून पाहणे ही आपल्या आयुष्यातील सगळ्यात आवश्यक कला आहे?


नैऱ्याश्य, चिंता , ताण , या मानसिक रोगांमध्ये विचारांची संततधार सुरूच असते.

तीच कशी थांबवावी हे सांगितलं आहे.



For More Information, Please Call on – 90828 97659.





44 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page