तीव्र विषादविकृती (Major Depression)
हताशपणाचा रुग्ण व्यक्तीपेक्षा जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या वर्तनात विषादाची अधिक लक्षणे आढळून लागतात आणि ती सातत्याने प्रकटू लागतात तेव्हा त्या व्यक्तीच्या बिघाडाचे निदान 'तीव्र विषादविकृती' (Major Depresssion) असे केले जाते. किमान दोन आठवडे सातत्याने ही व्यक्ती आत्यांतिक विषादपूर्ण मन:स्थितीत असते अथवा आनंददायी गोष्टींमध्ये तिला अजिबात रस वाटेनासा होतो. याचबरोबर पुढील लक्षणापैकी किमान चार लक्षणे व त्यापेक्षा जास्त तिच्या अनुभवास येतात
1. थकवा अथवा शक्तीपात
2. निद्रानाश किंवा अतिनिद्रा
3. भूक मंदावणे अथवा अकारण वजनात घट
4. मनोकारक क्षोभ अथवा शैथिल्य
5. विचार करण्याची अथवा एकाग्रतेची क्षमता खालवणे
6. स्वदोषारोपण इतके टोकाचे करणे की त्यातून गतकाळातील अविचाराबद्दल विचारांबद्दल स्वतःला प्रमाणाबाहेर अपराधी अथवा नालायक समजणे.
7. मृत्यूबद्दलचे विचार अथवा आत्महत्येची कल्पना परत परत येत राहणे
या लक्षणांपैकी किमान चार लक्षणे किंवा आधीची दोन अशी एकूण सहा लक्षणे सलगपणे दोन आठवडे प्रत्येक दिवशी व्यक्तीकडून अनुभवली गेल्यास त्या व्यक्तीचे आजाराचे निदान हे तीव्र विषानात्मक विकृती असे होते; परंतु जर या कालावधीत एक जरी उत्तेजकतेचा अनुभव आला तर ते निदान चुकीचे ठरून ती व्यक्ती 'द्विअवस्था' मन:स्थितीत बिघाडाची रुग्ण ठरू शकते.
तीव्रविषादविकृतीच्या रुग्णामध्ये आढळणाऱ्या या दुःखाच्या लक्षणांमध्ये काही बोधात्मक आणि प्रेरणात्मक लक्षणेही दिसतात. काही वेळेला दुर्मनस्कतेची लक्षणेही विभ्रम आणि चिंतनभ्रम या रूपात आढळतात. अशा रुग्णांचे निदान दुर्मनकस्कतायुक्त तीव्रविषविकृती असे म्हटले जाते. या भ्रमाचा आशय हा अपुरेपणा, अपराधीपणा, मृत्यू आजारपण अशा प्रकारचा नकारात्मक असतो. तो लक्षात घेता या विकृतीमधील विषयात ही लक्षणे सुसंगत आहेत हे, कळून येते.
#Stress #Anxiety #RehabCentreforDrugAddicts #RehabCentreforAlcoholAddicts #RehabilitationCentreMumbai #DeaddictionCentreMumbai #NashMuktiKendraMumbai #StayHomeStaySafe #RehabCentre #DeAddictionCentre #PsychiatricCentre
For More Information, Please Call on – 9172909091.
Comentários